कर्मवीर भाऊराव पाटील: Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi

 कर्मवीर भाऊराव पाटील निबंध | Karmveer Bhaurao Patil Essay in Marathi | Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi | Bhaurao Patil Biography | Karmveer Bhaurao Patil History Marathi Pdf

Karmveer Bhaurao Patil Information In marathi

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म दिनांक 24 सप्टेंबर 1887 साली कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी झाला.  त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते.भाऊराव पाटील यांचे मूळ गाव म्हणजे कर्नाटकातील मूडबिद्री होय.भाऊराव पाटील यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्रात स्थलांतर केले व त्यांचे मूळ देसाई असलेले आडनाव काढून महाजन हे आडनाव लावले व ते पन्हाळा येथे वाजणमापे बनवण्याचा व्यवसाय करू लागले. या पोस्ट मधून तुम्हाला भाऊराव पाटील यांच्या बद्दल सर्व माहिती जसे की त्यांचे कार्य, त्यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था, भाऊराव पाटील यांनी लिहिलेले ग्रंथ इत्यादि बद्दल सविस्तर  माहिती मिळेल. तरी कृपया हा लेख शेवट पर्यन्त वाचावा ही विनंती.

{tocify} $title={Table of Contents}

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण (Karmveer Bhaurav Patil Education) विटा, दहिवाडी अश्या वडलांच्या बादलीच्या ठिकाणी झाले. भाऊरावांनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोल्हापूर येथे प्रायवेट शाळेत केली. छत्रपती शाहू यांनी एप्रिल 1901 साली स्थापन केलेल्या दिगंबर जैन वसतीगृहात मार्च 1902 ला भाऊराव राजाराम हायस्कूल च्या इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर त्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. कर्मवीर भाऊराव पाटील इंग्रजी 6 वी म्हणजे आजची 10 वी शिकले.

महादेव गोविंद रानडे

Karmveer Bhaurav Patil Main Highlight

पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील
जन्म 24 सप्टेंबर 1897
मृत्यू 1 मे 1959
टोपण नाव कर्मवीर
विभाग मराठी बायोग्राफी
वडील पायगोंडा पाटील
मूळ गाव कुंभोज
पत्नी लक्ष्मी बाई

दूधगाव विद्यार्थी आश्रम

  • 1910 साली भाऊरावांच्या आदक्का म्हणजे अण्णासाहेब पाटील कुंभोज यांची मुलगी यांच्याशी विवाह झाला. 
  • वडील एकदा रागावल्यानंतर त्यांनी रागाने घर सोडले.
  • ते काही दिवस मणिकचंद जव्हेरी यांच्या कडे कामाला होते.
  • सर्व सुधारनांसाठी शिक्षण महत्वाचे आहे अशी त्यांची खात्री झाली.
  • 1909 मध्ये आपल्या मित्रांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील दूधगाव येथे दूधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना केली.
  • या आश्रमात त्यांनी मराठा, महार, मुसलमान अश्या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना

रयत शिक्षण संस्थेची स्थापना भाऊराव पाटील यांनी दिनांक 24 ऑक्टोबर 1919 ला केली. सातारा जिल्ह्यातील कारले येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. या परिषदेत भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी संस्था स्थापन करण्याची सूचना केली, व त्यात दिन, दलित, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विचार मांडला. या संस्थेस रयत शिक्षण संस्था असे नाव मंजूर करून 4 ऑक्टोबर 1919 रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर कारले येथे याची स्थापना झाली.

रयत शिक्षण संस्थेचे नियम व अटी

  • मागासलेल्या विद्यार्थ्यांत शिक्षणाची रुचि निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांनी गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नये या गोष्टीची खास दाखल रयत शिक्षण संस्थेत घेतल्या जात होती.
  • तसेच विद्यार्थ्यांनी रूढी व परंपरा मानू नयेत
  • गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे.
  • जाती मध्ये भेदभाव करू नये.
असे नियम रयत शिक्षण संस्थेचे होते.

रयत शिक्षण संस्थेचा विस्तार

1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर सातारा येथे झाले. याच वर्षी त्यांनी तिथे एक वसतिगृह काढले व त्या वसतिगृहात मोहिते नावच्या अस्पृश्यास ठेवून सुरुवात केली. पुढे त्या वसती गृहाचे छत्रपती शाहू बोर्डिंग असे नामकरण केले व महात्मा गांधीच्या हस्ते त्या वसतिगृहाचे उद्घाटन केले.

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न

1) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे नाव काय होते?

– लक्ष्मी बाई

2) कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी झाला?

– 24 सप्टेंबर 1887

3) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

– कर्मवीर भाऊराव पाटील

4) कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू कधी झाला?

– 1 मे 1959

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.