FD Plans: या 4 खास FD योजना उद्या बंद बंद होणार आहेत ज्यांच्यावर सर्वाधिक 8.85% व्याज मिळत आहे, पहा कोणत्या आहेत या योजना

मित्रांनो, या 4 खास Fixed Deposit Scheme ची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. RBI बँकेने Repo Rate मध्ये वाढ केली होती त्यानंतर बहुतेक बँकांनी FD वरील व्याजदर वाढवले होते आणि जनतेसाठी खास विशेष योजना देखील सुरू केल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे या Special FD Schemes अंतर्गत तुम्हाला कमी केलेच्या गुंतवणुकीत अधिक व्याज मिळेल. चला तर मग जाणून घेऊ की या खास विशेष FD योजना कोणत्या आहेत.

मित्रांनो, या योजनांमद्धे SBI ची Amrut Kalash Yojana, HDFC बँकेची Special Care योजना, इंडियन बँकेची IND Shakti योजना आणि पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष योजनांचा समावेश आहे.

Amrit Kalash Deposit (SBI)

स्टेट बँकेची महत्वाची विशेष मुदत ठेव योजना अमृत कलश उद्या म्हणजे दिनांक 31 मार्च 2023 रोजी बंद होणार आहे. या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज दर आणि इतरांना 400 दिवसांच्या Fixed Deposit वर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे. या योजनेत सामान्य लोकांसाठी 1 लाख रुपयांच्या बचत ठेवीवर 8017 रुपये व्याज आणि जेष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या ठेवीवर 8600 रुपये व्याज मिळेल.

IND SHAKTI 555 DAYS

Indian बँकेची IND SHAKTI 555 DAYS खास FD योजना फक्त 31 मार्च 2023 पर्यंत वैध आहे. या योजनेमध्ये तुम्ही 5000 रूपायापासून ते 2 कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता. IND SHAKTI 555 DAYS योजनेवर 7.50% व्याजदर मिळत आहे. ही Fixed Deposit Scheme 555 दिवस कालावधी ची आहे.

HDFC Bank Senior Citizen Care Scheme

HDFC Senior Citizen Care योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना 75 महिन्याच्या विशेष ठेवीवर 7.75% व्याज मिळेल. या योजनेत तुम्ही 1000 रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या मध्ये जेष्ठ नागरिकांना मासिक, त्रैमासिक, साहमही, आणि वार्षिक व्याज मिळण्याची सुविधा आहे अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही HDFC Bank सोबत संपर्क करू शकता.

Punjab & Sind Bank

पंजाब आणि सिंध बँक आपल्या विशेष Fixed Deposit Scheme वर सर्वाधिक 8.85% पर्यंत व्याज देत आहे. जेष्ठ नागरिक म्हणजे 80 वर्षे पूर्ण केलेले गुंतवणूकदर PSB-उत्कर्ष 222 दिवसांच्या वीहेश FD वर 8.85% म्हणजे सर्वाधिक व्याज मिळवू शकतात. ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळवायचा असेल त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी बँकेत जाऊन घ्यावा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.