Weather Report Today: मित्रांनो, राज्यात उन्हाचा झाला वाढला आहे त्यामुळे कमाल तापमान 39 अंशाच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात आज विदर्भात तुरळक ठिकाणी वीज आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील आणि उन्हाचा चटका कायम राहील असा अंदाज आहे. (Hawaman Andaj)
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होतांना दिसत आहे. बुधवारी ब्रम्हपुरी यथे राज्यातील यावर्षीच्या सर्वात उच्च ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच वर्धा येथे 39 अंश आणि सोलापूर, अमरावती, चंद्रपुर येथे कमाल तापमान 33 ते 37 अंशाच्या दरम्यान होते. किमान तापमानत ही बर्याच अंशी वाढ झाली असून बहुतेक ठिकाणी पारा 15 ते 24 अंशाच्या दरम्यान गेला आहे. (Maharashtra Weather Report)
विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा, ते दक्षिण भागापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मिटर उंचीवर हवेचा कमी दाबचा पट्टा तयार झाला आहे. आणि वार्यांचे प्रवाह सुद्धा खंडित झाले आहेत. पश्चिम बंगाल हिमळायकडील भागापसून ओडिशपर्यंत आणखी एक हवेचा काम दाबचा पट्टा सक्रिय झाला आहे.
तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान तयार होतांना दिसत आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा असून, तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज (Hamwaman Andaj) आहे.
पावसाचा इशारा
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.