350 रु प्रती क्विंटल कांदा अनुदान 2023 जाहीर फक्त हेच शेतकरी पात्र ठरतील नवीन GR पहा | Kanda Anudan Yojana Maharashtra 2023

मित्रांनो, या वर्षीच्या फेब्रुवारी महिण्याच्या सुरूवातीस कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) खूप मोठी घसरण पाहायला मिळाली. वेगवेगळ्या शेतकरी संघटना आणि शेतकरी यांच्या कडून Kanda Anudan Maharashtra 2023 ची होणारी मागणी पाहता कांदा बाजारभावात होणारी घसरण आणि उपाययोजना यासाठी माजी पणन महासंचालक श्री सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक 28/02/2023 नुसार गठित समितीने राज्यातील बाजार समित्यांना भेटी देत शेतकरी, अडते, व्यापारी आणि विविध संघटनांचे प्रतींनिधी तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला आहे आणि हा अहवाल दिनांक 9 मार्च 2023 ला राज्य शासनाला सादर केला आहे.

या अहवाल समितीने दीर्घकालीन आणि अल्पकालील उपाययोजनांच्या शिफारशी प्रस्तावित केल्या आहेत. या तातडीच्या उपययोजणांपैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याच्या विचाराने दिनांक 1 फेब्रुवारी 2023 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिति, खाजगी बाजार समिति मध्ये विक्री केलेल्या शेतकर्‍यांना अनुदान देण्याची तयारी शासनाची होती. (Kanda Anudan Yojana Maharashtra 2023)

Kanda Anudan Yojana Maharashtra 2023

महाराष्ट्र राज्यातील कृषि उत्पन्न बाजारसमित्यांमध्ये किंवा नाफेड द्वारे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कलावधीत खरीप हंगामातील लाल कामदा वोकरी केलेल्या शेतकर्‍यांना कमीत कमी 200 रुपये प्रती क्विंटल आणि जास्तीत जास्त 350 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे अनुदान (Kanda Anudan 2023) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्ही शासनाने जाहीर केलेला GR Download करू शकता.

Download GR

Kanda Anudan Yojana 2023 Maharashtra नुसार शेतकर्‍यांना जास्तीत जास्त 350 रुपये आणि कमीत कमी 200 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. ज्या शेतकर्‍यांनी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधी मध्ये कांद्याची विक्री केली होती तेच शेतकरी 350 रुपये प्रती क्विंटल कांदा अनुदान मिळवण्यासाठी पात्र असतील.

या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, 7/12 चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक ज्या बाजारसमिती मध्ये कांद्याची विक्री केली आहे तेथे जाऊन तुम्हाला Kanda Anudan Yojana 2023 साठी अर्ज करावा लागेल. जे शेतकरी अर्ज करतील फक्त तेच हे अनुदान मिळव्यासाठी पात्र असतील.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.