मित्रांनो, कांद्याचे माहेरघर समजला जाणारा नाशिक जिल्हा पुन्हा संकटात सापडला आहे. नाफेड (NAFED) ने कांदा खरेदी अचानक बंद केल्याने कांद्याच्या दरात खूप मोठी घसरण झाली आहे.
हवालदिल झालेल्या शेतकरी उत्पादकांना दिलासा दिण्यासाठी प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सरकार कडून सुरू करण्यात आली होती. राज्याची अर्थसंकल्प अधिवेशनाची सांगता होताच लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर कांदा खरेदी सुरू करण्यात आली होती. आणि ही खरेदी आता अचानकपणे बंद करण्यात आली आहे. काल 1141 रुपये प्रती क्विंटल असलेला कांद्याचा दर आज 851 रुपयापर्यंत घसरला आहे. आज 300 रुपयाची घसरण कांदा बाजारभावा मध्ये पाहायला मिळाली. कांद्याच्या दरात आणखी घसरण होते की काय ही चिंता शेतकर्यांना सतावत आहे. (Onion Price Today)
लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. लासलगाव च्या बाजार समितीसह देशभरातील बाजारसमिती मध्ये लाल कंद्यांची प्रचंड आवक येण्यास सुरुवात झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत. दोनशे ते चारशे रुपयापर्यंत कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने अर्थसंकल्प अधिवेशना दरम्यान नाफेड मार्फत प्रथमच लाल कांद्याची खरेदी राज्य सरकार ने सुरू केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या बाबत घोषणा केली होती. आणि त्यानुसार मागच्या आठवड्यात शुक्रवार पर्यन्त 12000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी 3500 शेतकर्यांकडून करण्यात आली होती. परंतु अधिवेशन संपताच कांद्याची खरेदी सुद्धा नाफेड कडून बंद करण्यात आली.
Onion Price Today
लाल कांद्याला जास्तीत जास्त 851 रुपये प्रती क्विंटल आणि कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. आणि उत्पादन खर्च ही निघणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे कांद्याच्या अश्या दरामुळे शेतकर्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे. (Kanda Bajarbhav)