शेतकर्‍यांसाठी स्थापन होणार दहा हजार कंपन्या – दादाजी भुसे यांची माहिती

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी राज्यात शेतकरी उत्पादक तब्बल दहा हजार कंपन्या स्थापन होणार असल्याची माहिती दिली आहे. 

ही योजना यशस्वी करण्यासाठी पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची सांगड घालावी. आणि ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असायला हव्यात, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना

केंद्र सरकारमार्फत राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची योजना राबविण्यात येणार असून या कंपन्या तयार करण्याकरीता समुह आधारित व्यवसायिक संस्थांची नियुक्ती राज्यात करण्यात येत आहे.


आजचे बाजारभाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा


या संस्थांची बैठक कृषीमंत्र्यांनी काल दिनांक 24 मार्च 2021 रोजी मंत्रालयात घेतली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आणि वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


एका उत्पादक कंपनीत असणार ३०० शेतकरी

केंद्र शासनाच्या एफएसएसी, नाबार्ड, एमसीडीसी यांच्यामार्फत समुह आधारीत व्यावसायिक संस्थांची नेमणूक केली जाणार आहे. राज्यासाठी अशा 34 संस्थांची नेमणूक करण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकार चे आहे. एका शेतकरी उत्पादक कंपनीत तब्बल 300 शेतकरी मित्र असतील. या संस्थांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांना एकत्रित करुन प्रत्यक्ष काम करणारी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी. चांगल्या भावनेतून हा प्रकल्प आखण्यात आला असून त्याचा हेतू साध्य होण्याकरीता संस्थांनी मनापासून आणि आपुलकीच्या भावनेने काम करण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.


हेही वाचा – आनंदाची बातमी!! ट्रॅक्टर खरेदी साठी शेतकर्‍यांना मिळत आहे सरकार कडून भक्कम अनुदान आताच अर्ज करा


शेतकर्‍यांना मिळणार नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मिळावा,आणि त्यांची प्रगती व्हावी, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कृषी उत्पादनात वाढ व्हावी याला सुसंगत असे काम संस्थांनी करावयाचे आहे, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. या योजनेकरीता केंद्र शासनाने जी नियमावली केली आहे तीचे पालन करतानाच शेतकरी उत्पादक संस्था केवळ कागदावर राहू नयेत यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे, असेही दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. राज्यात कृषी विभागामार्फत येणारे वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. रासायनिक खतांचा वापर दहा टक्के कमी करावा. शेततळ्यांचे अस्तरीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहनही कृषीमंत्र्यांनी यावेळी केले.


उपयुक्त माहिती –

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.