कांदा अनुदानासाठी शेतकर्‍यांचा लढा परंतु सरकारच्या त्या एका अटीमुळे शेतकरी नाराज | Sanugrah Yojana 2023

Sanugrah Yojana 2023: मित्रांनो, कांद्याला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्ति केली. आणि त्यानंतर जाहीर अनुदानाच्या संदर्भात शेतकर्‍यांना अर्ज करतांना बर्‍याच अडचनींना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याचे चांगले बाजार भाव मिळत नसल्याने राज्य सरकारच्या वतीने सानुग्रह अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. या अनुदानासाठी शेतकर्‍यांनी आंदोलने केली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील शेतकर्‍यांना कांदा अनुदान म्हणून प्रती क्विंटल 500 रुपये मिळावे म्हणून मागणी केली होती. या सर्व गोष्टींची दखल घेत राज्य सरकार ने कांदा अनुदान (Kanda Anudan) म्हणून सानुग्रह योजना जाहीर केली होती या योजनेनुसार शेतकर्‍यांना प्रती क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले होते.

Kanda Anudan मिळावे म्हणून शेतकर्‍यांना आज पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

लाल कांद्याला 350 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे दोनशे क्विंटल पर्यन्त Sanugrah Anudan 2023 अर्ज स्वीकारण्यासाठी सर्वच बाजारसमित्यांमद्धे सुरुवात झाली आहे. मात्र ई-पीकपेर्‍याच्या एका अतीमुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकार ने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान विक्री केलेल्या लाल कांद्यालाच 350 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे दोनशे क्विंटल पर्यन्त Sanugrah Anudan 2023 देण्याचे जाहीर केले.

kanda Anudan 2023 मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना कांदा विक्री पावती, ई-पीकपेरा लावलेला सातबारा, बँक पासबूक, आधार कार्ड असे सर्व कागदपत्रे 20 एप्रिल च्या आत बाजारसमिती मध्ये जमा करावे असे आदेश देण्यात आले आहेत. परंतु बर्‍याच शेतकर्‍यांकडे साधा मोबाइल असल्यामुळे शेतकर्‍यांनी ई-पीक पेरा केलेला नाही त्यामुळे Kanda Sanugrah Yojana 2023 ला खूप कमी प्रतिसाद मिळत आहे.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp वर नककी फॉलो करा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.