आपले सरकार पोर्टल – अशी करा नोंदणी आणि घरबसल्या मिळवा कोणतेही सरकारी प्रमाणपत्र फक्त १५ रुपयात

नमस्कार, मित्रांनो कृषि योजना वर आपले स्वागत आहे. आज आपण आपले सरकार पोर्टल वर Registration कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत, आपले सरकार पोर्टल वरुन आपण जातीचा दाखला, नोन-क्रीमलेयर, उत्पन्नाचा दाखला इत्याद्दी डॉक्युमेंट खूपच कमी किमतीत काढू शकतो ते पण कोठेही न जाता घरबसल्या.

 महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात आपले सरकार पोर्टल नावाचे पोर्टल सुरू केले आहे. नागरिकांना सार्वजनिक सेवा हक्क कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या सार्वजनिक सेवेच्या अधिकाराविषयी माहिती देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. पोर्टल लोक आणि सरकार यांच्यात पूल म्हणून काम करते, ज्यामुळे त्यांना ऑनलाइन उपलब्ध सेवांसाठी अर्ज करण्याची परवानगी मिळते. याव्यतिरिक्त, पोर्टलवर सेवा नाकारल्या गेल्यास नागरिकांना तक्रार नोंदविण्याचा किंवा त्यांच्या तक्रारी नोंदविण्याचा अधिकार आहे.


आपले सरकार पोर्टल

पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया, लॉगिन प्रक्रिया आणि पोर्टलवरील स्थिती तपासण्यासाठी या लेखात आम्ही स्पष्ट केले आहे.


असे करा रजिस्ट्रेशन (aaplesarkar.mahaonline.gov.in)

 • आपल्या समोर खालील प्रकारे विंडो ओपन झालेली असेल

  • या पेज वर आपल्याला New User / Register Here असे दिसेल त्यावर क्लिक करा
  • नंतर आपल्या समोर पुढील प्रकारे एक नवीन विंडो ओपेन होईल.

  • पोर्टलवर आपले प्रोफाइल तयार करण्यासाठी वर दर्शविलेल्या कोणत्याही पर्यायांवर क्लिक करा.
  • तुम्ही तुमचे प्रोफाइल OTP verification करून सुद्धा तयार करू शकता.
  • OTP Verification झाल्यानंतर तुमचे Username आणि Password तयार करा.
  • खालील प्रमाणे तुमची माहिती इंग्रजी आणि मराठीत भरा.
  • जन्मतारीख, वय, लिंग प्रविष्ट करा
  • पत्त्या मध्ये तुमचा संपूर्ण पत्ता भरा.
  • जिल्हा, गाव, तालुका निवडून पिनकोड प्रविष्ट करा

  • Mobile Number and User Verification विभागात मोबाईल क्रमांक, ओटीपी, पॅन क्रमांक आणि यूआयडी क्रमांक प्रविष्ट करा.
  • Username आणि password टाका.
  • आवश्यक असलेले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा.

  सर्व माहिती भरल्यानंतर एकदा ती तपासून बघा सर्व माहिती बरोबर असेल तर Register बटन वर क्लिक करा. तुमचे Registration पूर्ण झाले.


  पुढील लेखा मध्ये आम्ही आपल्याला आपले सरकार पोर्टल वरुन कोणताही सरकारी दाखला कसं काढायचा या विषयी माहिती देऊ.

  लेख आवडला असेलतर नक्कीच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अश्याच प्रकारे नावनवीन माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

  Leave a Comment

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.