कमी पैशात मोठा फायदा होणार्‍या मोदी सरकारच्या योजना (List of Modi Government Scheme)

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, २०१४ मध्ये श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर तेव्हा पासून आज पर्यन्त मोदींनी खूप मोठ्या योजना शेतकरी,कामगार,बेरोजगार यांच्या साठी सुरू केल्या आहेत. त्या पैकी कमी गुंतूवणूक करून मोठा फायदा देणार्‍या काही योजनांबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. 

काही विशेष योजना केंद्र सरकार द्वारा चालवल्या जातात,ज्या तुम्हाला म्हातारपणात सुद्धा उपयोगी पडू शकतात त्यामुळे म्हातारपणात पैशांची चिंता करण्याची गरज नाही. देशातील गरीब आणि बेरोजगार लोकांसाठी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदी सरकारने बरीच खास व्यवस्था केली आहे. जेणेकरून त्यांना सहजपणे जीवन घालवता येईल. आज आम्ही तुम्हाला अशा 4 सरकारी योजनाबद्दल सांगणार आहोत, ज्यात अगदी कमी पैशाची गुंतवणूक करून तुम्हाला चांगले पैसे मिळतील.


१) अटल पेंशन योजना (Atal Pension Scheme)

मोदी सरकारने सुरू केलेल्या दोन पेन्शन योजना लोकांना खूपच आवडत आहेत त्या पैकी एक म्हणजे अटल पेंशन योजना होय. कोरोना सारख्या महामारीच्या संकटाच्या काळात अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन सिस्टम यांच्या अंतर्गत खातेधारकांची संख्या ही 22 टक्क्यांनी वाढून 4.15 कोटी झाली आहे.अटल पेंशन योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये ते पाच हजार रुपयांच्या पेन्शनची सरकार हमी देते. अटल पेन्शन योजनेत वयाच्या 60 वर्षानंतर मिळालेल्या पेन्शनच्या आधारे योजनेचे विभाजन केले जाते. दरमहा 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 रुपये पेन्शन मिळण्याची योजना आहे. जर तुम्हाला 1000 पेन्शन म्हणून 1000 रुपये घ्यायचे असतील तर त्यानुसार तुम्हाला हप्ता भरावा लागेल आणि जर तुम्हाला 5 हजार रुपये हवे असतील तर त्या प्रमाणात तुम्हाला हप्ता भरावा लागेल आणि त्यात मग वाढ होईल. अटल पेंशन योजने बद्दल आम्ही आधीच सविस्तर पोस्ट लिहिली आहे तुम्हाला आधिक माहिती हवी असल्यास तुम्ही येथे क्लिक करून बघू शकता.


२) प्रधानमंत्री श्रमयोगी मंदिर योजना (PM Shramyogi Yojana)

सरकारने ही श्रमयोगी मंदिर पेंशन योजना सन २०१९ मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना शासनाकडून पेन्शनच्या स्वरुपात मदत दिली जाते. या योजनेंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रुपयांचे पेन्शन दरमहा देण्यात येते. म्हणजेच तुम्हाला वर्षाकाठी 36 हजार रुपये मिळतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या योजनेतून आतापर्यंत सुमारे ४३ लाख ७० हजार लोकांना जोडले आहे.


३) प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Yojana)

जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला वर्षाकाठी ३६००० रुपये कमावण्याची ही सुवर्णसंधी आहे. मोदी सरकारकडून तुम्हाला ही रक्कम पंतप्रधान किसान मानधन योजने अंतर्गत मिळणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक पैसासुद्धा खर्च करावा लागणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेत असलेले सर्व शेतकरी सुद्धा पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.


हेही वाचा – आतुरता संपली या तारखेला जमा होईल प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा 8 वा हप्ता


वर्ष २०१९ मध्ये पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली होती. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना पेंशन च्या स्वरुपात मदत दिल्या जाते. आतापर्यंत ११.७१ कोटी लोक या योजनेत सामील झाले आहेत. केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभही देत ​​आहे. योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. त्याच वेळी त्यात सामील झाल्यावर आपण आपल्या खिशातून कोणतेही पैसे न घालवता ३६००० रुपये मिळविण्यास पात्र ठरू शकता.


४) प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना (Pradhanmantri Laghu Vyapari Mandhan Yojana)

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये झारखंडमध्ये प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना सुरू केली होती. ही योजना म्हणजे छोट्या व्यावसायिकांसाठीची निवृत्तीवेतन योजना आहे. छोट्या व्यावसायिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा हा मोदी सरकार चा उपक्रम आहे, त्याअंतर्गत ६० वर्षांच्या वयानंतर त्यांना महिन्याला ३००० रुपये पेंशन मिळेल.


उपयुक्त माहिती –

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.