नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू केला आहे आणि तो नियम असा आहे की ज्या रेशन कार्ड धारकांचे उत्पन्न विहित पात्रतेपेक्षा जास्त वाढले असेल, त्यांना त्यांचे रेशनकार्ड लकवर बंद करावे लागेल. तसे न केल्यास त्यांना शासनाच्या नवीन नियमांनुसार दंड भरावा लागेल. याशिवाय रेशन कार्ड च्या नियमांमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत. या पोस्ट मधून, आम्ही तुम्हाला हा नवीन नियम काय आहे या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत, तरी विनंती आहे की हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचावा.
सध्या रेशन कार्ड द्वारे मिळत असलेला लाभ
मागील 2 वर्षात देशातील लोकांना कोरोना महामारीमुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. जे लोक बीपीएल श्रेणीत येतात त्यांना कोरोना संकटाच्या काळात मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने मोफत रेशन (Free Ration) योजनाही सुरू केली होती. ज्या अंतर्गत त्यांना मोफत रेशन दिले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मोफत रेशन योजना मागील २ वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत डिसेंबर महिन्यापर्यंत या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत राहणार असल्याने त्यांना काळजी करण्याची गरज नाही. मोफत रेशन (Free Ration Card) योजनेचा कालावधी सरकार कडून वाढविण्याचा विचार केला जात आहे परंतु अद्याप तसे काही अपडेट समोर आलेले नाही.
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाच्या अटी
केंद्र सरकार कडून राबविण्यात येत असलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ रेशन कार्ड धारकांना खालील अटी व पात्रतेच्या आधारे देण्यात येत आहे:
- रेशन कार्ड धारक हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- रेशन कार्ड धारकाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- रेशन कार्ड धारकाकडे एसी, चारचाकी, ट्रॅक्टर किंवा मोठे वाहन असू नये.
- याशिवाय तो राहत असलेल्या घराचे क्षेत्रफळ हे 100 चौरस मीटरपेक्षा जास्त नसावे.
नवीन नियम काय आहे
मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी नुकतेच केंद्र सरकारने काही नवीन नियम लागून केले असून त्यात काही बदल केले आहेत. हे बदल पुढील प्रमाणे आहेत:
- नवीन नियमानुसार, या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसलेल्या अशा रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड रद्द करण्यात येत आहेत.
- यासोबतच अशी कुटुंबे किंवा रेशन कार्ड धारक ज्यांचे उत्पन्न वाढले असून ते विहित पात्रता मर्यादेपेक्षा जास्त आहे अश्या लोकांना डीएसओ कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जाऊन त्यांचे रेशनकार्ड लवकरात लवकर सरेंडर करावे लागेल.
- याशिवाय या योजनेनुसार आणखी एक नवीन बदल करण्यात आला आहे तो म्हणजे रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला 7 ते 15 तारखेदरम्यान रेशन मिळेल.
- आणि असे रेशन कार्ड धारक ज्यांच्या कडे अंत्योदय कार्ड आहे त्यांना 14 किलो गहू आणि 21 किलो तांदूळ देण्यात येईल.
रेशन कार्ड कोणाला सरेंडर करावे लागेल
जसे की, आम्ही तुम्हाला वर सांगितले आहे केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत, आणि त्या नियमांतर्गत ज्या रेशन कार्ड धारकांचे वार्षिक उत्पन्न वाढले आहे त्यांना या पुढे सरकार कडून मोफत रेशन चा लाभ मिळणार नाही. अश्या लोकांनी त्यांचे रेशन कार्ड लवकरात लवकर तहसील कार्यालयात जमा करावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि त्यांना दंडही भरावा लागू शकतो.