या राज्यात पावसाचा रेड अलर्ट – हवामान विभागाचा अंदाज (Hawaman Andaj)

भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या म्हणजे 17 जून या दिवशी रेड अ‌ॅलर्ट दिला आहे.

Hawaman Andaj
Hawaman Andaj

{tocify} $title={Table of Contents}

    भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा व रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या दिवशी रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. दुसरीकडे ऊद्या म्हणजे दिनांक 18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवला आहे.

    भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    18 जून ला कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस

    पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

    हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

    19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तीन धरणे तुडुंब भरली आहेत. तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाण्याचा संचय झाला आहे. 

    हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

    गेल्या चार दिवसात जिल्ह्यात सरासरी 432 मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, दुथडी भरून वाहत असताना तीन लघु पाटबंधारे प्रकल्पात 100 टक्के पाण्याचा संचय झाला आहे. यात सावंतवाडी तालुक्यातील माडखोल ,मालवण मधील धामापूर व कणकवली तालुक्यातील हरकूळ या लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. तर नऊ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 50 टक्क्याहुन जास्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन तीन दिवस पावसाचा जोर असाच राहिला तर सर्वच धरणे भरुन जातील, अशी शक्यता आहे.

    Leave a Comment

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.